हिंदुंमध्ये प्रचलित असलेल्या देवदेवतांच्या पुजनाच्या विविध पध्दती व विचारधारांची एकत्रित माहिती या ठिकाणी मिळेल. येथे उपलब्ध असलेल्या सर्वच माहितीशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वाचकांनी आपल्या बुद्धिचा योग्य उपयोग करुनच या माहितीचा वापर करावा ही नम्र विनंती.

विशेष लेख

 • laxmiyantra.gif
  यंत्र म्हणजे विशिष्ट ईश्वरी शक्तीचा आविष्कार प्राप्त करण्याचे साधन
 • ganapati.jpg
  ज्यांना गणेशाला १०८ दूर्वा वहावाच्या असतील त्याच्याकरीता खालील नामावली दिली आहे एक एक नाम उच्चारुन एक एक दूर्वा वहावी
 • गायत्री मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, प्राणायाम मंत्र
 • ganapati.jpg
  श्री गणपतीची उपासना आपल्याकडे वेदकाळापासुन चालु आहे. केवळ देशातच नव्हे तर नेपाळ, ब्रह्मदेश, इंडोनेशिया यासारख्या देशात ती असावी या मताला पुष्टि देणा-या काही प्राचीन गणेशमूर्ती या देशांमध्ये सापडल्या आहेत. गणेशाची उपासना करायची कारण तो विघ्नें, संकटें दुर करणारा आहे. सर्व काही आनंदमय आणि मंगल करणारा आहे. तो असला की सगळी कामें अडथळा न येता पार पडतात असा सगळ्यांचा विश्वास, श्रध्दा आहे. म्हणुन त्याची पूजा करायची. तो ‘चिंतामणी’ आहे म्हणजे जे चिंततो, ज्याची इच्छा करतो ते सर्व काही देणारा आहे. तो चांगली बुध्दी, चांगले विचार देणारा आहे. बुध्दी आणि विचार चांगले असतील तर कामेहि आपोआपच चांगलीच होतात. यासाठी गणेश उपासना आवश्यक आहे. गणेश उपासनेसाठी अथर्वशीर्ष अतिशय उपयुक्त आहे. या मंत्राचा जप शूचिर्भूत होऊन आणि अर्थ समजुन केला तर त्याचे फळ ताबडतोब मिळते.
 • suryanamaskar1.gif
  प्रातःकाळीं शौच मुखमार्जन व स्नान करुन नंतर सूर्याच्या कोंवळ्या किरणात नमस्कारदेवता श्रीसूर्यनारायण त्याला भक्तिपूर्वक वंदन करुन रोज नियमित साष्टांग नमस्कार घातल्याने आपादमस्तक सर्व शरीरात एकसारखी उष्णता उत्पन्न होऊन आरोग्यास आवश्यक असलेले रुधिराभिसरण जोराने सुरु होते. नाड्या नाड्यातला मळ हा रुधिराभिसरणाने घामाच्या रुपाने बाहेर फेकला जाउन शरीर हलके व चपळ बनते सर्व अवयव प्रमाणबद्ध व पुष्ट होतात जठराग्नि प्रदिप्त होऊन अन्नपचन चांगले होऊ लागते.